About Us
माझा प्रवास : दुःखाच्या सावलीतून प्रेमाच्या प्रकाशाकडे
वयाच्या २३ व्या वर्षी, जेव्हा मुली आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत असतात, तेव्हा माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. वडिलांचं छत्र हरवलं. दुःखाचा डोंगर समोर होता, पण आपल्या संस्कृतीतील रीतीरिवाजांमुळे त्या दुःखातच, अवघ्या सहा महिन्यांत माझं लग्न झालं. वडिलांच्या निधनाचं दुःख मनात घेऊन मी एका नवीन घरात, नवीन नात्यात प्रवेश केला.
सुरुवात स्वप्नवत होती. सुशिक्षित सासर, समजूतदार पती आणि इतकं प्रेम की लोक विचारायचे, ‘तुमचं लव्ह मॅरेज आहे का?’ त्या काळात मी सुखाच्या शिखरावर होते. पण आयुष्याचं दुसरं वळण अजून बाकी होतं.
पहिल्या बाळाच्या जन्मानंतर जणू सर्वकाही बदललं. ज्या घरात प्रेमाचा वर्षाव होता, तिथेच आता वादांचे पडसाद उमटू लागले. ज्याला आपण ‘सासुरवास’ म्हणतो किंवा पती-पत्नीमधील विसंवाद, त्यातून माझं मानसिक संतुलन ढासळू लागलं. एका बाजूला मी माझा ‘ड्रीम जॉब’ मिळवला होता, पण दुसऱ्या बाजूला घरात डिप्रेशन आणि स्ट्रेसने आमचा ताबा घेतला होता.
पण, म्हणतात ना, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा देव एक खिडकी उघडी ठेवतो.
मला माझे मार्गदर्शक भेटले. मी स्वतःच्या माईंडसेटवर (Mindset) काम करायला सुरुवात केली. ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ची ताकद समजून घेतली. मी हे शिकले की, परिस्थिती बदलण्याआधी मला माझे ‘विचार’ बदलावे लागतील. आणि चमत्कार घडला!
ज्या नात्यात दुरावा आला होता, तेच नातं पुन्हा एकदा ‘लव्ह मॅरेज’सारखं बहरलं. आज माझ्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आमचं नातं केवळ टिकलेलं नाही, तर ते हॅप्पी, हेल्दी आणि पॉझिटिव्ह आहे.
जेव्हा मी माझं आयुष्य बदलू शकले, तेव्हा मी ठरवलं की माझ्यासारख्या हजारो ‘अपर्णा’ असतील ज्या रोज हे दुःख सोसत आहेत. त्यांना मार्ग दाखवणं हेच आता माझ्या जीवनाचं ध्येय आहे. कारण शेवटी, जीवनाचा खरा गोल ‘हॅपिनेस’ (आनंद) हाच आहे.
Our Values
Making Relationships Healthier & Happier
Love & Compassion
We approach every relationship with empathy, kindness, and emotional safety.
Emotional Awareness
Understanding emotions is the foundation of all healthy relationships.
Commitment
We are committed to long-term healing—not quick fixes.
Growth
Personal growth leads to relationship growth. Both go hand in hand.
Honesty
We encourage honest communication with yourself and your partner.
Partnership
Healthy relationships are built through teamwork, respect, and shared responsibility.